तेलंगणातील प्रसिद्ध गायक, कवी 'गदर' यांचं निधन ; हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूनंतर एक निवेदन दिलं असून त्यात गदर यांचं फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या आणि वृद्धपकाळाने निधन झालं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तेलंगणातील प्रसिद्ध गायक, कवी 'गदर' यांचं निधन ; हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भारतीय कवी आणि कार्यकर्तेत तसंच तेलंगणातील प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं आज (६ ऑगस्ट रविवार) रोजी निधन झालं आहे. गदर हे ७७ वर्षाचे होते. गुम्मडी विठ्ठल राव या त्यांच्या रंगमंचाच्या नावाने प्रचंड लोकप्रिय होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूनंतर एक निवेदन दिलं असून त्यात लोकप्रिय कवी गुम्मडी विठ्ठल राव याचं फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या आणि वृद्धपकाळाने निधन झालं आहे.

गदर यांनी हृदय विकाराचा त्रास होता. यामुळे त्यांनी २० जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर सर्जरी पार पडली होती. यानंतर त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना फुफ्फुस आणि लघवीची समस्या कायम होती. तसंच ती वाढत्या वयासोबत वाढत चालली होती. यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रख्यात कवी गदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झालं. तेलंगणातील लोकांवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना उपेक्षितांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हा सर्वांना लढण्याची प्रेरणा देत राहील,असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान गदर हे २ जुलै रोजी तेलंगणातील खम्मम येथे राहुल गांधी यांनी संबोधित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत उपस्थित होते. त्यांच्या निधनावर तेलंगणा भापचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबूनायडू आमि इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

गदर हे पूर्वी नक्षलवादी होते

गायक होण्यापूर्वी गदर हे नक्षलवादी होते. ते भूमिगत जीवन जगत होते. १९८० च्या दशकात त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झालेले गदर हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते.

logo
marathi.freepressjournal.in