शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा येथे रोखले; सीमेवर चक्काजाम

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी ७ फेब्रुवारीला शेतकरी महापंचायत बनवली होती.
शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा येथे रोखले; सीमेवर चक्काजाम

नवी दिल्ली : पायाभूत सुविधांसह अन्य कामासाठी घेतलेल्या भूखंडाच्या वाढीव नुकसानभरपाईसाठी शेतकरी संघटना डिसेंबर २०२३ पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी नोएडा व ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाकडून भूखंड व वाढीव नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी दिल्लीकडे वाटचाल सुरू केली. संसदेला घेराव घालून मागण्या मांडण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेश-दिल्ली महामार्गावर चक्काजाम झाला. या आंदोलनामुळे नोएडा एक्स्प्रेस-वे बंद केला आहे.

नोएडा, ग्रेटर नोएडा प्राधिकरण, एनटीपीसी व अंसल बिल्डरच्या विरोधात नोएडा येथील शेतकरी ६० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांना तीन शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी ७ फेब्रुवारीला शेतकरी महापंचायत बनवली होती. ८ फेब्रुवारीला संसदेपर्यंत मार्च काढण्याची घोषणा केली. आंदोलक शेतकऱ्यांना ठिकठिकाणी पोलीस रोखत आहेत. पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट उडत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली व चालत दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने १४४ कलम लागू केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in