फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाच्या आपल्या उमेदवारीबाबत केली मोठी घोषणा

मी ममता दीदींचा आभारी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचाही मी ऋणी आहे
फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाच्या आपल्या उमेदवारीबाबत केली मोठी घोषणा

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून मी माझे नाव विचारातून मागे घेत आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, माझा विश्वास आहे की जम्मू आणि काश्मीर एका महत्त्वपूर्ण वळणावरून जात आहे आणि या अनिश्चित काळात मार्गक्रमण करण्यासाठी माझे प्रयत्न आवश्यक आहेत. माझ्यापुढे बरेच सक्रिय राजकारण आहे आणि मी जम्मू-काश्मीर आणि देशाच्या सेवेत सकारात्मक योगदान देण्यास तयार आहे. माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याबद्दल मी ममता दीदींचा आभारी आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचाही मी ऋणी आहे.

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा फारुख अब्दुल्ला यांची नावे पर्याय म्हणून ठेवण्यात आली होती, मात्र या दोन्ही नेत्यांनी आपली नावे मागे घेतली आहेत. शरद पवार यांनी आधीच आपले नाव मागे घेतले आहे.

15 जून रोजी झालेल्या विरोधी पक्षांच्या या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांचे नावही विरोधकांनी सुचवले होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधक आणखी एक बैठक घेणार असून या बैठकीची वेळ आणि ठिकाण ठरवण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in