वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संघाबाहेर गेला होता. बुधवारी शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू झालेली असतानाच टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संघाबाहेर गेला होता. बुधवारी शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. भारतीय संघाने शमीच्या जागी उमेश यादवला पर्यायी खेळाडू म्हणून निवडले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी शमीचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळणार होती; पण तो कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. बीसीसीआयने बदली खेळाडूची घोषणा करताच काही तासांनंतर शमीची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी ही निश्चितच संघासाठी दिलासा देणारी बातमी आहे; मात्र शमीला पुन्हा संघात स्थान मिळेल की नाही, हा मोठा प्रश्न आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in