संपूर्ण देशभरात थंडीची चाहूल सुरु झाली आहे. तसंच देशभरात प्रदूषणाचे देखील प्रमाण वाढले आहे. अनेक राज्यात पहाटेची धुक्ये पडायला सुरुवात झाली आहे. आता याचा धुक्यामुळे अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत. धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर अनेक वाहने एकमेंकावर आदळली आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर धडकलेल्या आणि खराब झालेल्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना येथील खन्ना भागात अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. पहाटेच्या या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.
या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणांत जीवितहानीसोबतच मोठ्या संख्येने आर्थिक हानीही झाल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. या अपघातामध्ये 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.