मुलांसाठी आई-वडिलच सर्वकाही मुलाला भेटायला बापाला परवानगी ; दिल्ली हायकोर्टाचे आदेश

पित्याला एका वर्षापर्यंत मुलाची भेट घेता येईल, असे न्यायालयाने सांगितले
मुलांसाठी आई-वडिलच सर्वकाही मुलाला भेटायला बापाला परवानगी ; दिल्ली हायकोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एखादा व्यक्तीने दुसरे लग्न केल्यानंतर त्याला पहिल्या पत्नीच्या मुलापासून दूर केले जाऊ शकत नाही. आई-वडिल आर्थिक संकटात असतानाही मुलांसाठी त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे सांगून दिल्ली हायकोर्टाने एका पित्याला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली.

२०१० मध्ये या मुलाच्या आईचा मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी जावयाविरोधात हत्येची तक्रार केली. २ वर्षे तुरुंगात राहिल्यावर तो २०१२ मध्ये तुरुंगातून निर्दोष सुटला. या निकालाला सासऱ्याच्या मंडळींनी हायकोर्टात आव्हान दिले.

आईचा मृत्यू झाला तेव्हा हा मुलगा दीड वर्षांचा होता. वडिल तुरुंगात गेल्यावर तो आजी-आजोबांसोबत राहत होता. त्या आजी-आजोबांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेऊन नातवाची कायमस्वरुपी कस्टडी मागितली. कोर्टाने ती नाकारली. न्या. सुरेश कुमार कैत व न्या. नीना बन्सल शर्मा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

खंडपीठाने सांगितले की, पित्याच्याविरोधात फौजदारी गुन्हयाशिवाय कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे त्याच्या पित्याला कस्टडीसाठी अयोग्य ठरवता येणार नाही. पित्याने दुसरे लग्न केले आहे. त्यातून त्याला दुसरा मुलगा आहे. त्यामुळे पहिली पत्नीपासून झालेल्या मुलाची कस्टडी त्याला देता येणार नाही. मात्र, पित्याला एका वर्षापर्यंत मुलाची भेट घेता येईल, असे न्यायालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in