फादर्स डे स्पेशल : Google ने साकारले खास Doodle

आई जशी घराची घडी सांभळत असते त्याचप्रमाणे दुसरीकडे वडिल बाहेर कष्ट करुन पैसे कमवत असतात
फादर्स डे स्पेशल : Google ने साकारले खास Doodle

भारतीय कुटुंबामध्ये मुलांच्या मनामध्ये आई वडिलांची एक प्रतिमा असते. आई प्रेमळ समजुन घेणारी व वडिल कठोर,वारंवार ओरडणारे असे असतात. अनेकदा मुले आईसमोर सगळ्या मनातल्या गोष्टी शेअर करतात. परंतु वडिलांसमोर कोणती गोष्ट सांगताना घाबरतात. मुले वडिलांच्या कठोर धाकामुळे आपले वडिल हिटलर सारखे आहेत असेही गमतीने बोलतात. परंतु मुलांचे वडिलांवर प्रेम कायम असते. ते प्रेम अनेकदा व्यक्त करता येत नाही त्यासाठी आजचा दिवस असतो तो म्हणजे फादर्स डे.

आई जशी घराची घडी सांभळत असते त्याचप्रमाणे दुसरीकडे वडिल बाहेर कष्ट करुन पैसे कमवत असतात. मुलं जसजशी मोठी होतात तशी त्यांना जबाबदारीची जाणीव होऊ लागते. वडिलांची भूमिका काय असते याची त्यांना जाणीव होते. वडिल स्वत: फाटके शुज घालतात पण मुलांसाठी नव्या कोऱ्या वस्तु आणुन देतात. वडिलांच्या या प्रेमाचा व त्यागाचा सन्मान करण्यासाठी जगातील सर्व देशामध्ये फादर्स डे साजरा केला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी वडिलांना खास वाटावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मागच्या वर्षी प्रमाणेच आज १९ जून २०२२ रोजी फादर्स डे निमित्त सर्च इंजिन गुगुल ने खास डूडल बनवले आहे.

आज फादर्स डेच्या निमित्ताने गुगलच्या डूडलमध्ये एक लहान आणि एक मोठा हात दिसत आहेत. यामध्ये वडील आणि मुल पेंटिंग करत असल्याचे दिसते आहे. वडील आणि मुले आपल्या हाताचा ठसा कागदावर उमटवत आहेत. वडिलांना समर्पित फादर्स डेच्या डूडलमध्ये मुल वडिलांची प्रतिमा कशी बनते हे स्पष्टपणे दाखवले आहे.

म्हणुन फादर्स डे साजरा करतात

या दिवशी वडिलांच्या प्रती असलेल त्याग, प्रेम, जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुले वडिलांना वेगवेगळ्या भेटवस्तु देतात. वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर या भावना फादर्स डेच्या माध्यमातुन व्यक्त करता येतात.

काय आहे फादर्स डेचा इतिहास ?

सोनोरा नावाच्या मुलीला आई नव्हती आणि तिच्या वडिलांनीच इतर पाच भावंडांसह सोनोराला दोन्ही पालकांचे प्रेम दिले आईच्या मायेने वाढवले. आपल्या वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण पाहून सोनोराच्या मनात विचार आला की,आईच्या मातृत्वाला समर्पित म्हणून मातृदिन साजरा केला जाऊ शकतो, तर वडिलांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सन्मान म्हणून ‘फादर्स डे’ही साजरा करता येईल.

या माहितीनुसार, १९१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर १९२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला, त्यानंतर १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. १९७२ मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला होता. अशाप्रकारे फादर्स डे साजरा करण्याची सुरुवाच झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in