लडाखवासी रस्त्यावर उतरले; पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन

जम्मू-काश्मीरपासून वेगळा करत केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लडाखवासीय रस्त्यावर उतरले आहेत.
लडाखवासी रस्त्यावर उतरले; पूर्ण राज्याच्या मागणीसाठी आंदोलन

लद्दाख : जम्मू-काश्मीरपासून वेगळा करत केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लडाखवासीय रस्त्यावर उतरले आहेत. हजारो लोकांनी सहाव्या अनुसूची अंतर्गत केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षण देण्याची मागणी करत मोर्चा काढला. या मागणीसाठी संपूर्ण लद्दाख बंद ठेवले. लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. विशेष म्हणजे सध्या लडाख परिसरात कडाक्याची थंडी पसरलेली असताना लोक रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलादेखील सहभागी झाल्या. यावेळी लडाखला राज्याचा दर्जा द्यावा, राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करावी आणि लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र संसदीय जागा मिळाव्यात, अशा घोषणा दिल्या.

यापूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी निदर्शने केली होती. मात्र, त्याआधी लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या प्रतिनिधींसोबत चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. तरीही जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि परिसरात संप पुकारण्यात आला.

लद्दाखच्या जनतेच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच गृह व्यवहार राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in