आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा,राष्ट्रीय बाल आयोगाचा आदेश

आरे बचाव आंदोलनात लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे
 आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा,राष्ट्रीय बाल आयोगाचा आदेश
Published on

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात वाद अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरे आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी आदेशवजा नोटीस राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना बजावली आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरे बचाव आंदोलनात लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे. तीन दिवसांत एफआयआरसह अहवाल देण्याचे राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in