अखेर कुस्तीपटूंचं आंदोलन मागे, न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार

सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं
अखेर कुस्तीपटूंचं आंदोलन मागे, न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार

दिल्लीतील जंतरमंतर याठिकाणी सुरु असेले कुस्तीपटूंचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. आता या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हा संघर्ष आता न्यायालयात सुरु राहिल असं कुस्तीपटूंकडून सांगण्यात येत आहे. दिल्ली न्यायालयाने बृजभूषण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रत कुस्तीपटूंना देण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांची कॉपी देण्यात यावी अशी मागणी केली होती.

१५ जून रोजी बृजभूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी १५०० पानांचे आरोपपत्र दाखल दाखल करण्यात आलं होतं. सहा महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीवरुन हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्यावरील पोक्सो अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफासर केली होती. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोपांवर आरोपपत्र दाखल केलं आहे.

ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावरिधात आंदोलन करत अटकेची मागणी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. याप्रकरणी सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं होतं. आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला असून ही लढाई न्यायालयात सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in