खलिस्तानी नेत्याच्या हत्येच्या कटात भारतीय आढळणे ही गंभीर बाब ;परराष्ट्र खात्याकडून चिंता

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जो दावा अमेरिकेने केला.
खलिस्तानी नेत्याच्या हत्येच्या कटात भारतीय आढळणे ही गंभीर बाब ;परराष्ट्र खात्याकडून चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेतील एका खलिस्तानी नेत्याच्या कथित हत्या प्रकरणात भारतीय नागरिक सामील झाल्याच्या आरोपावर परराष्ट्र खात्याकडून चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले असून तपासासाठी यापूर्वीच समिती बनवली आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने या प्रकरणाच्या सर्व पैलूंवर अभ्यास करायला १८ नोव्हेंबरला उच्चस्तरीय तपास समिती बनवली आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. फुटिरतावादी नेत्याच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर बायडेन प्रशासन चिंतेत होते. त्यांनी तात्काळ सीआएचे संचालक विल्यम्स बर्न व राष्ट्रीय गुप्तचर संचालक एवरिल हेन्स यांना ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करून यातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी भारतात पाठवले.

या प्रकरणी बागची म्हणाले की, यापूर्वीही आम्ही सांगितले की, द्विपक्षीय सुरक्षा करारात अमेरिकेसोबतच्या चर्चेत अमेरिकेने संघटित गुन्हेगार, बंदूकधारी व दहशतवाद्यांशी संबंधित लोकांची माहिती दिली होती. भारत या प्रकरणाच्या सूचना गांभीर्याने घेतो, असे संकेत आम्ही दिले होते. कारण याबाबी आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांवर प्रभाव टाकतात. संबंधित विभाग हे या मुद्याचा तपास करत आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जो दावा अमेरिकेने केला. त्याच बाबी आम्ही यापूर्वी सांगत होतो. भारताला या बाबी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. भारत सरकारला आमच्यासोबत काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाता येऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in