‘फिनटेक कंपन्यांनी कायद्याचे पालन करावे’

पेटीएम पेमेंट्स बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या नियामक कारवाईने फिनटेक कंपन्यांनी कायद्याचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे
‘फिनटेक कंपन्यांनी कायद्याचे पालन करावे’

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या नियामक कारवाईने फिनटेक कंपन्यांनी कायद्याचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले. नियमांचे पालन करणे हे ‘ऑप्शनल’ असू शकत नाही. त्यामुळे कंपन्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, यावर मंत्र्यांनी यावर जोर दिला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, म्हणाले की पेटीएम पेमेंट्स बँकेची समस्या हे असे प्रकरण आहे जिथे एक कठोर आणि आक्रमक उद्योजक नियामक अनुपालनाची गरज ओळखण्यात अयशस्वी ठरला आहे आणि कोणत्याही कंपनीला कायद्याचे पालन न केल्यास फटका बसतो.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) च्या संकटादरम्यान कोणतीही कंपनी, मग ती भारतातील असो किंवा परदेशातील, मोठी असो की लहान, त्यांनी देशाच्या कायद्याचे पालन केले पाहिजे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘पीपीबीएल’ला १५ मार्चपासून नवीन ठेवी स्वीकारण्यास मनाई केली आहे आणि कंपनीविरुद्ध केलेल्या कारवाईचा कोणताही आढावा नाकारला आहे.

चंद्रशेखर म्हणाले की, मला वाटते की याने फिनटेक उद्योजकांचे लक्ष वेधत तुम्हाला कायद्याचे पालन कसे करावे हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. नियामक अनुपालन कोणत्याही देशासाठी ‘पर्यायी’ गोष्ट नाही.

logo
marathi.freepressjournal.in