कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी १७ वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने येडियुरप्पा यांच्यावर तक्रार दाखल केली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर  POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडियुरप्पा यांच्यावर लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याच्या कायद्या अतंर्गत (POCSO) आणि आयपीसी ३५४ (अ) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती 'द हिंदू'ने दिली आहे.

बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी (१४ मार्च) १७ वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने येडियुरप्पा यांच्यावर तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, लैंगिक अत्याचाराची घटनाही २ फेब्रुवारी २०२४ मध्ये घडली होती. पीडित मुलीची आई आणि मुलगी ही एका फसवणुकीच्या केसप्रकरणी मदत घेण्यासााठी येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. तेव्हा येडियुरप्पा यांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी मध्यरात्री येडियुरप्पा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पॉस्को गुन्ह्यात एवढ्या वर्षाची होते शिक्षा

आयपीसीनुसार, लैंगिक अत्याचार प्रकरणात 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. ही शिक्षा वाढून जन्मठेपेपर्यंत होऊ शकते. १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात किमान २० वर्षाची शिक्षा असून ती शिक्षा जन्मठेपेपर्यंत देखील वाढू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in