लखनऊ सरकारी रुग्णालयात आग ;एक जण ठार, १० जखमी

व्हेंटिलेटर फुटल्याने आग लागली. आग लागल्यानंतर शहरात अफरातफरी माजली. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिले
लखनऊ सरकारी रुग्णालयात आग ;एक जण ठार, १० जखमी
PM

लखनऊ : लखनऊच्या संजय गांधी पीजीआई रुग्णालयात सोमवारी आग लागली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून १० जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या ६ बंब गाड्यांनी ही आग विझवली.

व्हेंटिलेटर फुटल्याने आग लागली. आग लागल्यानंतर शहरात अफरातफरी माजली. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिले. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय व ऑपरेशन थिएटरची सुरक्षा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे सचिव पार्थ सारथी सेन शर्मा यांना घटनास्थळी पाठवले आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in