तामिळनाडूत फटाका कारखान्यात स्फोट; १० ठार

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत.
तामिळनाडूत फटाका कारखान्यात स्फोट; १० ठार

विरुधुनगर : वेंबकोट्टाई येथील कुंदयिरुप्पू गावात फटाका उत्पादन युनिटमध्ये शनिवारी अचानक झालेल्या स्फोटात सहा पुरुष आणि चार महिला अशा दहा कामगारांचा मृत्यू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या संबंधात माहिती दिली. ते म्हणाले की, दोन राज्यमंत्र्यांना बचाव आणि मदतकार्यात समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गावातील फटाके बनविणाऱ्या युनिटच्या केमिकल मिक्सिंग रूममध्ये ही दुर्घटना घडली. सुरुवातीला स्फोटामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३ जखमींना उपचारासाठी शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे विरुधुनगरचे जिल्हाधिकारी व्ही. पी. जयसीलन यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत केमिकल मिक्सिंग रूममध्ये जास्त गर्दी होती आणि केमिकल हाताळत असताना स्फोट झाला असावा, असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या मालकाकडे परवाना होता. हा स्फोट मानवी चुकांमुळे झाला असावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in