भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार; ४ जणांचामृत्यू झाला असून संपूर्ण परिसर सील

पंजाबच्या भटिंडा मिलिट्री कॅम्प परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली
भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार; ४ जणांचामृत्यू झाला असून संपूर्ण परिसर सील

पंजाबच्या भटिंडा मिलिटरी कॅम्पवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा मिलिट्री कॅम्प पहाटे ४ च्या सुमारास गोळीबार झाला. यानंतर क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) सक्रिय झाली आणि संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून हा परिसर सील करण्यात आला आहे.

भारतीय सैन्याने पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नसून हा गोळीबार ८० मीडियम रेजीमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाली. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या रूममधून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. कदाचित त्याच रायफलने फायरिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या गोळीबार करणाऱ्याचा तपास सुरु आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, भटिंडा मिलिटरी कॅम्प परिसरात झालेल्या गोळीबारामध्ये तोफखाना युनिटचे ४ लष्करी जवान हुतात्मा झाले आहेत. इतर कोणत्याही कर्मचार्‍यांना दुखापत झाली नसून मालमत्तेचे नुकसान नोंदवलेले नाही. सध्या पुढील तपास सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in