इराणमधील भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात दाखल

इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीयांना तातडीने मायदेशी परतण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक भारतात परतले. इराणमधील भारतीय नागरिकांची पहिली तुकडी शुक्रवारी रात्री विमानाने दिल्लीत दाखल झाली.
इराणमधील भारतीयांची पहिली तुकडी मायदेशात दाखल
Published on

नवी दिल्ली : इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीयांना तातडीने मायदेशी परतण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक भारतात परतले. इराणमधील भारतीय नागरिकांची पहिली तुकडी शुक्रवारी रात्री विमानाने दिल्लीत दाखल झाली. मात्र, किती भारतीय नागरिक मायदेशात आले ते कळू शकले नाही.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर अली नक्वी या भारतीय नागरिकाला विचारण्यात आले की, इराणमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, त्याने कोणतीही समस्या भेडसावली नाही, असे सांगितले.

वैद्यकीय शिराजमधील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, इंटरनेट सेवा उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्या देशात काय चालले आहे याची कल्पनाच येत नव्हती. मात्र, शहरातील स्थिती सामान्य होती, असेही तिने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in