मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गोवा समुद्रकिनाऱ्यापासून ७० सागरी मैल अंतरावर मच्छीमार नौका नौदलाच्या पाणबुडीला धडकली. या दुर्घटनेत नौकेवरील दोन खलाशी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

Published on

गोवा समुद्रकिनाऱ्यापासून ७० सागरी मैल अंतरावर मच्छीमार नौका नौदलाच्या पाणबुडीला धडकली. या दुर्घटनेत नौकेवरील दोन खलाशी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

‘मारथोमा’ या मच्छिमारी नौकेवर १३ खलाशी होते. त्यापैकी ११ जणांना वाचविण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या दोन खलाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाने सहा जहाजे तैनात केली असून विमानांद्वारेही शोध घेतला जात आहे. नौदलाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

नौदलातर्फे समुद्रात ‘सी व्हिजिल २४’ या मोहिमेंतर्गत सराव सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा नौदलाच्या स्कॉर्पिन वर्गातील पाणबुडीला मच्छीमार नौकेने धडक दिली.

या धडकेत डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाणबुडीचे किती नुकसान झाले याचा तपशील भारतीय नौदलाने जाहीर करण्यास नकार दिला. ही पाणबुडी जहाजविरोधी क्षेपणास्त्र व दीर्घ पल्ल्याच्या पाणसुरुंगाने सज्ज आहे.

यंदाच्या जुलैमध्ये मुंबईतील नौदल गोदीत क्षेपणास्त्रवाहू आयएनएस ब्रह्मपुत्रा या विनाशिकेला भीषण आग लागली होती. त्यावेळी भारतीय नौदलाच्या सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

किनारपट्टी संरक्षणाचा सराव सुरू असताना मच्छीमारी बोटीला अपघात होणे ही बाब भारतीय नौदलासाठी लाजीरवाणी आहे, असे नौदलाच्या वरिष्ठ कमांडरने सांगितले. ही मच्छीमारी नौका स्टेल्थ पाणबुडीला धडकेपर्यंत ही बाब उघड होत नाही, हे किनारपट्टी संरक्षणातील सुरक्षेचे उल्लंघन आहे.

भारतीय नौदलाचा किनारपट्टी संरक्षणासाठी चौथा ‘सी विजील-२४’ सराव संपला. भारताची ११०९८ किमीची किनारपट्टी आहे. तसेच २.४ दशलक्ष चौरस किमीची विशेष आर्थिक विभाग आहे. याच्या संरक्षणाची जबाबदारी नौदलाची आहे. या किनारपट्टी संरक्षण सरावात सहा मंत्रालय व २१ राज्य व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. गेल्या दहा वर्षात नौदलाच्या पश्चिम विभागात अनेक अपघात झाले आहेत. त्यात युद्धनौका व पाणबुड्यांना आग, बोटींचे धडकणे आदी घटना घडल्या आहेत. जानेवारी २०२२ मध्ये मुंबईत ‘आयएनएस रणवीर’ या युद्धनौकेत स्फोट झाला होता. त्यात तीन सैनिकांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in