फिच रेटिंग्सकडून भारताच्या पतमापनाबद्दल अहवाल जारी

रेटिंग एजन्सीने 'बीबीबी'वर भारताचे सार्वभौम रेटिंग कायम ठेवले
फिच रेटिंग्सकडून भारताच्या पतमापनाबद्दल अहवाल जारी
Published on

फिच रेटिंग्सने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी सार्वभौम रेटिंगचा अर्थात पतमापनात नकारात्मक ते स्थिर असा बदलला आहे. यामागची कारणे देत अहवालात म्हटले आहे की, देशातील आर्थिक सुधारणा झपाट्याने होत असल्याने मध्यम कालावधीत विकासदर कमी होण्याचा धोका कमी झाला आहे. तथापि, रेटिंग एजन्सीने 'बीबीबी'वर भारताचे सार्वभौम रेटिंग कायम ठेवले.

शुक्रवारी जारी केलेल्या अहवालात, फिच पतमापन संस्थेने म्हटले की, जगभरात महागाईचे तीव्र झटके बसत असतानाही, भारतातील आर्थिक सुधारणा आणि वित्तीय क्षेत्रातील असुरक्षितता कमी झाल्यामुळे जीडीपीत घट होण्याची शक्यता कमी झाली आहे. वाढ होण्यास मदत होईल. तथापि, पतमापन संस्थेने चालू आर्थिक वर्षातील आर्थिक वाढीचा अंदाज ७.८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यापूर्वी हा अंदाज ८.५ टक्के ठेवण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in