
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टसाठी जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या महिन्यात वेगवेगळ्या कारणांमुळे बँका १८ दिवस बंद राहणार आहेत. १ ऑगस्टलाही बँका बंद होत्या. आता ८ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त सुट्ट्या असतील. ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान बँका पाच दिवस बंद राहतील. याचा अर्थ या आठवड्यात फक्त तीन दिवस बँकिंग कामकाज चालेल.
मंगळवारी (९ ऑगस्ट) बँकेत मोहरमची सुट्टी असणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१२ ऑगस्ट) रक्षाबंधनाची सुट्टी असेल. काही ठिकाणी ११ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुटीही असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने १३ ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. १४ ऑगस्टला रविवार असल्याने तर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. या आठवड्यानंतर १८ ऑगस्ट (गुरुवार) आणि १९ ऑगस्ट (शुक्रवार) जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी असेल. महिन्याचा चौथा शनिवार असल्याने पुढील सुट्टी २७ ऑगस्टला असेल. २८ ऑगस्टला रविवार असल्याने बँका बंद राहतील.