तामिळनाडूत चहाच्या दुकानात ट्रक घुसून पाच जण ठार, १९ जण जखमी

तामिळनाडूच्या पुदुकोट्टाई जिल्ह्यातील नमनसमुद्रम येथे तिरुची-रामेश्वरम मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
तामिळनाडूत चहाच्या दुकानात ट्रक घुसून पाच जण ठार, १९ जण जखमी
Published on

पुदुकोट्टाई : रस्त्याच्या बाजूला असलेल्या चहाच्या दुकानाला धडकण्यापूर्वी सिमेंटने भरलेल्या लॉरीने दोन वाहनांनाही धडक दिल्याने पाच जण ठार झाले, तर १९ जण जखमी झाले, ज्यात बहुतांश भाविक आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तामिळनाडूच्या पुदुकोट्टाई जिल्ह्यातील नमनसमुद्रम येथे तिरुची-रामेश्वरम मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

या घटनेत चहाच्या स्टॉलवर भाविक थांबले होते. त्यांना कल्पनाही नसताना अकस्मातपणे ही दुर्घटना घडली. अरियालूरहून शिवगंगाकडे जाणाऱ्या लॉरीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने प्रथम कार व व्हॅनला धडक दिली. त्यानंतर तो चहाच्या दुकानात घुसला.

तिरुवल्लूर येथील हे भाविक ओमशक्ती मंदिराच्या सहलीला जात होते, तर व्हॅनमध्ये अय्यप्पा भक्तांना नेले जात होते. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना पुदुकोट्टई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नमनसमुद्रम येथे धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in