Manipur: मणिपूरमधील हिंसाचारात पाच जणांचा बळी

मणिपूरमध्ये शनिवारी जिरीबाम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Manipur: मणिपूरमधील हिंसाचारात पाच जणांचा बळी
@manipur_police/ X
Published on

इंफाळ : मणिपूरमध्ये शनिवारी जिरीबाम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षा दलांनी चुराचांदपुर जिल्ह्यात दहशतवाद्यांचे तीन बंकर्स उद‌्ध्वस्त केले आहेत. विष्णूपूर जिल्ह्याच्या लगतच्या भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, एका झोपलेल्या व्यक्तीला गोळी मारली तर अन्य चौघेजण आपापसातील गोळीबारात मरण पावले.

दरम्यान, राज्यातील तणावाची परिस्थिती पाहता सरकारने शाळा व महाविद्यालये बंद केली आहे. कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी या संस्थेने कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याप्रकरणी जनता संचारबंदीचे आवाहन केले आहे. राजधानी इंफाळमधील दुकाने शनिवारी सकाळपासून बंद आहेत. रस्ते व बाजारात चिटपाखरूही नाही.

मणिपूरमध्ये १ ते ७ सप्टेंबर दरम्यान हिंसेच्या चार घटना घडल्या आहेत. आतापर्यंत तीन घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in