खराब हवामानामुळे नवी दिल्ली, बंगळुरू येथील विमान उड्डाणांना विलंब

विमानतळ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केआयए बंगळुरू येथे धुक्याच्या जाड थरामुळे शहरातील विमानतळावर काही फ्लाइटचे लँडिंग होण्यास विलंब झाला.
खराब हवामानामुळे नवी दिल्ली, बंगळुरू येथील विमान उड्डाणांना विलंब
Published on

नवी दिल्ली : खराब हवामानामुळे रविवारी सकाळी दिल्ली विमानतळावर तब्बल नऊ उड्डाणे वळवण्यात आली.सकाळी ४.३० ते १०.३० दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानासह ही उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली.

खराब हवामानामुळे सुरुवातीला मुंबईकडे वळवण्यात आलेले आंतरराष्ट्रीय उड्डाण नंतर जयपूरला वळवण्यात आले अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

रविवारी दिल्ली आणि उत्तर भारताच्या इतर भागांमध्ये धुक्याच्या दाट थराने अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत घसरली होती. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पालम वेधशाळेने सकाळी ५ वाजेपर्यंत दाट धुके आणि दृश्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आल्याची नोंद केली.

त्याचप्रमाणे बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४४ उड्डाणांना रविवारी खराब हवामानामुळे उशीर झाला. त्यामुळे काही विमाने लँडिग होण्यातही खराब हवामानामुळे उशीर झाला असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमानतळ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केआयए बंगळुरू येथे धुक्याच्या जाड थरामुळे शहरातील विमानतळावर काही फ्लाइटचे लँडिंग होण्यास विलंब झाला. बंगळुरूसह अनेक शहरांमधील खराब हवामान आहे. या ४४ पैकी सात उड्डाणे दिल्लीला गेली होती, तर एक चेन्नईहून बंगळुरूला वळवण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in