कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्ट सोडणार; बालाजी त्यागराजन यांच्याकडे अंतरिम जबाबदारी

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती ११ वर्षांहून अधिक काळ कंपनीत काम केल्यानंतर आपल्या पदावरून पायउतार होत आहेत.
कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्ट सोडणार; बालाजी त्यागराजन यांच्याकडे अंतरिम जबाबदारी
कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्ट सोडणार; बालाजी त्यागराजन यांच्याकडे अंतरिम जबाबदारीX
Published on: 

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती ११ वर्षांहून अधिक काळ कंपनीत काम केल्यानंतर आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. कंपनीने बुधवारी ही घोषणा केली असून, आगामी काही आठवड्यांत नव्या उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. तोपर्यंत कंपनीच्या संचालक मंडळासह बालाजी त्यागराजन अंतरिम नेतृत्व करतील.

त्यागराजन हे सध्या फ्लिपकार्टमध्ये ‘चीफ प्रॉडक्ट अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर’ म्हणून कार्यरत आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली फ्लिपकार्टचा व्यवसाय पाच पटींहून अधिक वाढला आणि भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांमधील तिचे स्थान अधिक भक्कम झाले. त्यांच्या कार्यकाळात ‘द बिग बिलियन डेज’ हा सेल भारताच्या सणासुदीच्या खरेदीचा समानार्थी बनला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)