नवीन एअरलाइन कंपनीची 'एंट्री': FLY91 चे गोव्यातून पहिले उड्डाण; सिंधुदुर्गसह पुणे, जळगावातही सेवा

एअरलाईनने रु. १,९९१ (सर्व समावेशी)चे विशेष भाडे सुविधा देखील सुरू केली आहे. कंपनीच्या उद्घाटन ऑफर सर्व विमानसेवांवर वैध असेल...
नवीन एअरलाइन कंपनीची 'एंट्री': FLY91 चे गोव्यातून पहिले उड्डाण; सिंधुदुर्गसह पुणे, जळगावातही सेवा
Published on

पणजी : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रातील नवी कंपनी फ्लाय 91 ने सोमवारी येथून बंगळुरूसाठी पहिले उड्डाण घेऊन व्यावसायिक ऑपरेशनला सुरुवात केली. हे विमान गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ०.७५५ वाजता केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूकडे रवाना झाले. प्रादेशिक विमान कंपनीने याच दिवशी सिंधुदुर्गला बेंगळुरूहून पहिले उड्डाण चालवले, असेही कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

एअरलाईनने रु. १,९९१ (सर्व समावेशी)चे विशेष भाडे सुविधा देखील सुरू केली आहे. कंपनीच्या उद्घाटन ऑफर सर्व विमानसेवांवर वैध असेल, असे ते म्हणाले. व्यावसायिक कामकाज सुरू झाल्याबद्दल भाष्य करताना, फ्लाय 91 चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले की, फ्लाय 91 सुरुवातीला गोवा, हैदराबाद, बंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान विमानसेवा देत आहे, एप्रिलमध्ये अगट्टी, जळगाव आणि पुणे येथे ऑपरेशन सुरू करण्याची योजना आहे.

logo
marathi.freepressjournal.in