वाढत्या यूएस बाँड उत्पन्नाचा फटका;विदेशी गुंतवणूक संस्थांनी इक्विटीमधून काढले २४,७०० कोटी

एफपीआयने या महिन्यात आतापर्यंत कर्जबाजारात १७,१२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
वाढत्या यूएस बाँड उत्पन्नाचा फटका;विदेशी गुंतवणूक संस्थांनी इक्विटीमधून काढले २४,७०० कोटी

नवी दिल्ली : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) या महिन्यात आतापर्यंत २४,७०० कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढले आहेत कारण अमेरिकेतील रोखे उत्पन्न वाढले आहे. दुसरीकडे, ते कर्ज बाजारांबाबत उत्साही असून त्यांनी या महिन्यात आतापर्यंत कर्ज बाजारात १७,१२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे ठेवींच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात (२५ जानेवारीपर्यंत) भारतीय समभागांमधून २४,७३४ कोटी रुपये काढले आहेत. याआधी, एफपीआयने संपूर्ण डिसेंबरमध्ये ६६,१३४ कोटी रुपयांची आणि नोव्हेंबरमध्ये ९,००० कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती.

अमेरिकेतील वाढत्या रोख्यांचे उत्पन्न ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे नुकतीच बाजारातील विक्रीला चालना मिळाली आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले. जागतिक शेअर बाजारातील रॅलीला ‘फेड पिव्होट’ने चालना दिली ज्याने १० वर्षांचे रोखे उत्पन्न ५ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांपर्यंत घसरले. आता १० वर्षांचे रोखे उत्पन्न ४.१८ टक्क्यांवर परत वाढले आहेत. त्यामुळे २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीतमध्येच फेडरल व्याजदरात कपात करेल, असे ते पुढे म्हणाले.

एफपीआयने नवीन वर्षाची सुरुवात सावधपणे भारतीय इक्विटी मार्केटमध्ये नफा बुक करण्याच्या दृष्टिकोनातून केली. शिवाय, भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी, व्याजदराच्या परिस्थितीवरील अनिश्चिततेने त्यांना बाजूला राहण्यास आणि पुढील संकेतांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त केले, हिमांशू श्रीवास्तव, मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक-व्यवस्थापक संशोधन, म्हणाला.

कर्ज बाजारातील तेजीबद्दल, तज्ज्ञांनी सांगितले की, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केलेल्या घोषणेने भारत सरकारचे रोखे त्यांच्या बेंचमार्क इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये जून २०२४ पासून जोडले जातील. त्यामुळे गेले काही महिने देशातील रोखे बाजारातील आवक प्रभावित झाली.

कर्जबाजारात १७,१२० कोटींची गुंतवणूक

एफपीआयने या महिन्यात आतापर्यंत कर्जबाजारात १७,१२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर डिसेंबरमध्ये डेट मार्केटमध्ये १८,३०२ कोटींची, नोव्हेंबरमध्ये १४,८६० कोटी आणि ऑक्टोबरमध्ये ६,३८१ कोटी रु. ची निव्वळ गुंतवणूक केली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. क्षेत्राच्या बाबतीत, एफपीआयने ऑटो आणि ऑटो ॲन्सिलरी, मीडिया आणि मनोरंजन आणि रिटेल, आयटीमध्ये विक्रेते होते आणि त्यांनी तेल आणि वायू, ऊर्जा आणि निवडक वित्तीय सेवांमध्ये खरेदी केली.

जिओजितचे विजयकुमार म्हणाले. एकूणच, २०२३ साठी एकूण एफपीआाय प्रवाह इक्विटीमध्ये १.७१ लाख कोटी रुपये आणि कर्ज बाजारात ६८,६६३ कोटी रुपये होता. त्यांनी मिळून भांडवली बाजारात २.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर २०२२ मध्ये जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांनी केलेल्या आक्रमक दरवाढीमुळे १.२१ लाख कोटी रुपयांची सर्वाधिक निधी काढून घेण्यात आला. तर तत्पूर्वी, गेल्या तीन वर्षांत एफपीआयने पैसे गुंतवले होते.

गेल्या आठवड्यात आघाडीच्या १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य १.१६ लाख कोटींनी घसरले आणि एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फटका बसला. सुट्टीमुळे कमी व्यवहार कामकाज झालेल्या आठवड्यात, बीएसई बेंचमार्क ९८२.५६ अंकांनी किंवा १.३७ टक्क्यांनी घसरला. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या क्रमवारीत, रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्या स्थानावर कायम असून त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलआयसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा क्रमांक लागतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in