परदेशी गुंतवणूकदारांनी सहा दिवसात गुंतवले २६,५०५ कोटी

शेअर बाजाराच्या माहितीनुसार, १ ते ८ डिसेंबर दरम्यान शेअर बाजारात २६५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी वित्तसंस्थांनी केली.
परदेशी गुंतवणूकदारांनी  सहा दिवसात गुंतवले २६,५०५ कोटी

नवी दिल्ली : डिसेंबरचा महिना मुंबई शेअर बाजारासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात सत्ता स्थापन केली. राजकीय स्थैर्य मिळण्याचे संकेत मिळल्याने परदेशी वित्त संस्थांचा आत्मविश्वास वाढला. डिसेंबरच्या पहिल्या सहा दिवसात मुंबई शेअर बाजारात २६५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी वित्त संस्थांनी केली. ऑक्टोबरमध्ये परदेशी वित्तसंस्थांनी ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर ऑॅगस्टमध्ये परदेशी वित्त संस्थांनी ३९,३०० कोटींची गुंतवणूक केली होती.

जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, परदेशी वित्तसंस्थांकडून गुंतवणुकीचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राजकीय स्थिरता कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत वाढत आहे. महागाई कमी झाली असून अमेरिकन बॉण्डचे यिल्ड कमी झाले. तसेच खनिज तेलाचे दर घसरणे आदी बाबी भारताच्या पथ्यावर पडल्या आहेत, असे

शेअर बाजाराच्या माहितीनुसार, १ ते ८ डिसेंबर दरम्यान शेअर बाजारात २६५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी वित्तसंस्थांनी केली. फाईडफोलिओ इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक किसलय उपाध्याय म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत एका पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे राजकीय स्थिरता भविष्यात कायम राहण्याची शक्यता दिसत आहे.

जागतिक स्तरावर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत अनेक देशांची चलने घसरली आहेत.

अमेरिकन ट्रेझरी बॉण्डचे यिल्ड घटल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा भारतीय शेअर बाजारात वळवला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या बँकांच्या समभागात मोठी गुंतवणूक केली. माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहन व कॅपिटल गुडस‌् क्षेत्रातील समभागांची खरेदी केली जात आहे. यंदा परकीय वित्त गुंतवणूकदारांनी १.३१ लाख कोटी रुपयांचे समभाग तर ५५८६७ कोटी रुपये रोखे बाजारात गुंतवले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in