विदेशी गंगाजळी ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची घसरण

२६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (एफसीए)च्या साठ्यात घट झाली आहे
विदेशी गंगाजळी ३ अब्ज अमेरिकन डॉलर्सची घसरण
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, २६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा अर्थात विदेशी गंगाजळी ३.००७ अब्ज अमेरिकन डॉलर्सनी घसरून ५६१.०४६ अब्ज डॉलर्स झाली आहे. यापूर्वी, १९ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात गंगाजळी ६.६८७ अब्ज अमेरिकन डॉलर्सने घसरुन ५६४.०५३ अब्ज डॉलर झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकीय पुरवणीनुसार, २६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (एफसीए)च्या साठ्यात घट झाली आहे. एफसीए हा एकूण चलन साठ्याचा एक प्रमुख घटक आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एफसीए (फॉरेन करन्सी अॅसेट्स) मध्ये २.५७१ अब्ज डॉलर्सने घट होऊन ४९८.६४५ अब्ज डॉलर्सवर आला आहे. परकीय चलन मालमत्तेच्या अंतर्गत, यूरो, पौंड आणि येन यांसारख्या चलनांची गैर-यूएस युनिट्स परकीय चलनाच्या साठ्यात येतात. त्यांची किंमत डॉलरच्या आधारे निश्चित केली जाते.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, २६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील सोन्याचा साठा ३९.६४३ अब्ज डॉलर्स होता. त्यात २७१ दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in