सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे निधन

सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार विजय शंकर यांचे पार्थिव एम्समध्ये दान करण्यात येणार आहे.
सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे निधन
एक्स
Published on

नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार विजय शंकर यांचे पार्थिव एम्समध्ये दान करण्यात येणार आहे. विजय शंकर हे उत्तर प्रदेश केडरचे १९६९ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी १२ डिसेंबर २००५ ते ३१ जुलै २००८ या कालावधीत सीबीआयचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात एजन्सीने अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी केली. यामध्ये आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांड, गुंड अबू सालेम आणि अभिनेत्री मोनिका बेदी यांचे पोर्तुगालमधून प्रत्यार्पण, तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा यांचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in