कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री शेट्टर भाजपात परतणार?

शेट्टर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंड केले.
कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री शेट्टर भाजपात परतणार?

बेंगळुरु : मागील वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजप पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्‍यासाठी भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. शेट्टर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची एक टीम पुढे आली आहे.

शेट्टर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंड केले. अखेर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांच्या प्रतिमेचा इतर मतदारसंघांवरही परिणाम होऊन भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. अलीकडेच कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर निवडून दिले आहे. शेट्टर हे बेळगावचे दिवंगत माजी खासदार सुरेश अंगडी यांचे जवळचे नातलग आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in