
काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनात सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नव्हती. तसेच, काल त्यांना ताप आल्याने रुग्णालयामध्ये दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयामध्ये डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनात सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती काँग्रेसच्या काही अधिकाऱ्यांनी दिली. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.