माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
Natwar Singh
माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन
Published on

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

के. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. संपुआच्या सत्तेच्या काळात २००४-०५ मध्ये ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते. तसेच पाकिस्तानात भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. १९६६ ते १९७१ या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ते पंतप्रधान कार्यालयात होते.

पेशाने राजनैतिक अधिकारी असलेल्या नटवर सिंह यांना राजकीय क्षेत्रात काम करताना राजनैतिक क्षेत्रातील व्यापक अनुभवाचा फायदा झाला. १९५३ मध्ये त्यांची निवड भारतीय परराष्ट्र सेवेत झाली. चीन, अमेरिका, पाकिस्तान व इंग्लंड आदी देशात त्यांनी राजदूत म्हणून काम केले. १९८४ मध्ये त्यांनी या सेवेतून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. राजस्थानच्या भरतपूर मतदारसंघातून ते संसदेवर निवडून गेले. १९८५ मध्ये ते स्टील, कोळसा, कृषी राज्यमंत्री तर १९८६ मध्ये ते परराष्ट्र राज्यमंत्री बनले.

१९८४ मध्ये त्यांना पद‌्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.

logo
marathi.freepressjournal.in