माजी हवाई दलप्रमुख भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश

तिरुपतीचे वायएसआर काँग्रेस नेते आणि माजी खासदार वरप्रसाद राव यांनीही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी हवाई दलप्रमुख भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जी पावले उचलली त्याची भदौरिया यांनी स्तुती केली.

भदौरिया उत्तर प्रदेशातील असून भाजपने लोकसभेच्या तेथील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. राष्ट्रउभारणीमध्ये सहभागी होण्याची आपल्याला संधी मिळेल, असे भदौरिया म्हणाले.

दरम्यान, तिरुपतीचे वायएसआर काँग्रेस नेते आणि माजी खासदार वरप्रसाद राव यांनीही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in