बारामुल्ला मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला रिंगणात

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) वतीने जाहीर करण्यात आले.
बारामुल्ला मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला रिंगणात

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) वतीने जाहीर करण्यात आले.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी येथे उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. प्रभावी शिया नेते आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी हे श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले. हा मतदारसंघ नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला आहे. कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in