हरयाणात माजी आमदाराला ईडीकडून अटक

तब्बल पाच दिवसांनंतर सोमवारी छापेमारीचे काम पूर्ण झाले.
हरयाणात माजी आमदाराला ईडीकडून अटक

चंदिगड : हरयाणातील माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्याचा साथीदार कुलविंदर सिंग यांना सोमवारी ईडीने अटक केली. बेकायदेशीर खाणी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान ही अटक करण्यात आली आहे. दिलबाग सिंग हे इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) पक्षाचे यमुना नगर मतदारसंघातील माजी आमदार आहेत. ४ जानेवारी रोजी ईडीने सिंग आणि सोनीपतचे काँग्रेस आमदार सुरिंदर पनवर यांच्यावर छापे मारले होते. तब्बल पाच दिवसांनंतर सोमवारी छापेमारीचे काम पूर्ण झाले. दिलबाग सिंग आणि कुलविंदर सिंग यांना मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने ताब्यात घेतले. दोघांना स्थानिक न्यायालयासमोर सादर करून कोठडी वाढवून घेण्यात येणार आहे. दिलबाग सिंग आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्याकडून पाच बेकायदेशीर रायफल, ३०० काडतुसे, शंभरपेक्षा अधिक दारूच्या बाटल्या आणि पाच कोटी रुपये रोख ईडीने जप्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in