Congress : आजपासून काँग्रेसचे महाअधिवेशन, पण पहिल्याच दिवशी प्रियांका, राहुल, सोनिया गांधी गैरहजर

आजपासून छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेसचे (Congress) महाअधिवेशन सुरु झाले असून अनेक विषयावर ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
Congress : आजपासून काँग्रेसचे महाअधिवेशन, पण पहिल्याच दिवशी प्रियांका, राहुल, सोनिया गांधी गैरहजर

आजपासून छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेसचे (Congress) महाअधिवेशन सुरु झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. मात्र, पहिल्याच दिवशी प्रियांका गांधी- वडरा, (Priyanka Gandhi) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) गैरहजर राहणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या अधिवेशनामध्ये राजकारणापासून ते अर्थव्यवस्थेसह विविध विषयावर ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच, आगामी २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यावरही या अधिवेशनात भर देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काँग्रेसचे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसचे हे ८५वे महाअधिवेशन असून २४ फेब्रुवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यादरम्यान या महाअधिवेशनामध्ये देशभरातून नेते हजर राहणार आहेत. भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, "हाथ से हाथ जोडो" ही टॅग लाईन या अधिवेशनासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच, या महाअधिवेशनात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि विरोधकांच्या एकजूटीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in