मनमोहन सिंग यांच्या अस्थी यमुनेत विसर्जित

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी रविवारी यमुना नदीत विसर्जित करण्यात आल्या. शीख पद्धतीने धार्मिक विधी यावेळी करण्यात आले.
मनमोहन सिंग यांच्या अस्थी यमुनेत विसर्जित
Published on

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी रविवारी यमुना नदीत विसर्जित करण्यात आल्या. शीख पद्धतीने धार्मिक विधी यावेळी करण्यात आले.

सिंग यांच्या कुटुंबीयांनी निगमबोध घाटावरून त्यांच्या अस्थी गोळा केल्या. त्यानंतर यमुना नदीच्या ‘अश्त घाटा’वर नेण्यात आल्या. यावेळी सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर, मुलगी उपिंदर सिंग, दमन सिंग, अमृत सिंग यांच्यासह अनेक नातेवाईक उपस्थित होते.

शीख धार्मिक परंपरेनुसार, त्यांच्या निवासस्थानी १ जानेवारी रोजी ‘अखंड पथ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर तीन जानेवारीला ‘भोग’ कार्यक्रम, अंतिम अरदास व कीर्तन रकाब गंज गुरुद्वारात होणार आहे.

अस्थी विसर्जनाला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कारा-वरून राजकारण पेटले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जमीन का दिली जात नाही आणि त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस सातत्याने उपस्थित करत आहे. तसेच निगमबोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आले नव्हते.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कारा-वरून राजकारण पेटले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जमीन का दिली जात नाही आणि त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस सातत्याने उपस्थित करत आहे. तसेच निगमबोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आले नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in