पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास

सुप्रीम कोर्टाने पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. १९८८ च्या रोड रेज प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धूंच्या शिक्षेत वाढ करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे २०१८ च्या आदेशाचे पुनरावलोकन केले. न्यायालयाच्या आदेशानुसार आता सिद्धू यांना पंजाब पोलीस ताब्यात घेतील. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धू यांना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायमूर्ती चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. ज्यामध्ये त्यांना हत्येचे प्रमाण न मानता निर्दोष हत्येसाठी दोषी ठरवले होते. उच्च न्यायालयाने सिद्धू आणि अन्य आरोपींना तीन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

पार्किंगवरुन झाला होता वाद

पतियाळा येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते. ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

भादंविच्या कलम ३२३

अंतर्गत सिद्धू यांना शिक्षा

भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ नुसार, जो कोणी जाणूनबुजून (कलम ३३४ मध्ये प्रदान केलेल्या प्रकरणांशिवाय) स्वेच्छेने एखाद्याला दुखावतो, त्याला जास्तीत जास्त एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. अपराध्यास एक वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिली जाईल.

सिद्धूंना न्यायालयाचा निर्णय मान्य

दरम्यान, या निकालानंतर नवज्योत सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in