रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांचे निधन

वेंकटरमणन यांच्या २ वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात मोठे बदल वेगाने होत होते. त्याचवेळी त्यांना आरबीआयचे गव्हर्नर बनवले गेले.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांचे निधन

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. १९९० च्या दशकात भारताला चलन संकटातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले होते.

एस. एस वेंकटरमणन हे आयएएस अधिकारी होते. त्यांना डिसेंबर १९९० मध्ये आरबीआयचे गव्हर्नर बनवले. डिसेंबर १९९२ पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. त्यांच्या दोन वर्षांच्या काळात देशावर सतत संकटे येत होती. त्यांच्याच काळात चलन संकट उभे राहिले होते. देशाला या संकटातून बाहेर काढण्याचे श्रेय त्यांचेच हेाते.

वेंकटरमणन यांच्या २ वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात मोठे बदल वेगाने होत होते. त्याचवेळी त्यांना आरबीआयचे गव्हर्नर बनवले गेले. तेव्हा देश आर्थिक उदारीकरणातून जात होता. तत्पूर्वी चलन संकट उभे राहिले. शेअर बाजारातील हर्षद मेहता घोटाळा त्यांच्याच काळात झाला. वेंकटरमणन यांनी त्वरीत निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेने सर्व संकटांचा सामना केला.

त्या काळात तत्कालीन चंद्रशेखर सरकारने गव्हर्नर बनवले होते. त्यांच्याकडे अर्थशास्त्रज्ञाची योग्यता नव्हती. तरीही त्यांना हे पद दिले होते. कारण चलन व्यवहाराच्या संकटाची त्यांना जाणीव होती. भारताचे परकीय चलन जवळजवळ संपले होते.

गव्हर्नर बनण्यापूर्वी १९८५ ते १९८९ दरम्यान ते अर्थसचिव बनले होते. निवृत्तीनंतर ते अशोक लेलँड, न्यू त्रिपुरा एरिया डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज, पिरामल हेल्थकेअर, एचडीएफसी आदी कंपन्यांच्या संचालक मंडळात त्यांनी काम केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in