अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'एफबीआय’ची छापेमारी

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ‘एफबीआय’च्या अनेक अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या घराला घेराव घातला आहे
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'एफबीआय’ची छापेमारी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान पॉम हाऊस व रिसॉर्ट मार ए लीगोवर सोमवारी रात्री ‘एफबीआय’ने छापेमारी केली.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ‘एफबीआय’च्या अनेक अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच त्याच्या घराचीही झाडाझडती घेतली जात आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी या छापेमारीला दुजोरा दिला आहे. आपल्याला २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.‌ ‌“फ्लोरिडातील पॉम बीच स्थित माझे सुंदर घर ‘मार ए लीगो’ एफबीआयने ताब्यात घेतले आहे. तिथे झाडाझडती घेतली जात आहे. तेथे ‘एफबीआय’चे अधिकारी उपस्थित आहेत.”पत्रकारांनी याविषयी ‘एफबीआय’च्या प्रवक्त्याला छेडले असता त्यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. “अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत असे कधीच घडले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in