नितीश कुमारांची कोलांटी; पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन : नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

गेल्या दोन दिवसांपासून बिहारच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू होती.
नितीश कुमारांची कोलांटी; पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन : नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा : काँग्रेससह देशातील २६ विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी कोलांटी उडी घेत पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेश केला आहे. त्यानंतर नितीश कुमार यांनी सायंकाळी पाच वाजता भाजपच्या पाठिंब्यावर नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय आणखी सहा जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपसह १२८ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचे पत्र राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना दिले होते.

गेल्या दोन दिवसांपासून बिहारच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू होती. नितीश कुमार इंडिया आघाडीला राम राम ठोकणार, याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. रविवारी सकाळी ११ वाजता नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या. नितीश यांनी राज्यपालांना १२८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. नितीश यांना भाजपच्या ७८, संयुक्त जनता दलाच्या ४५, एचएएमच्या ४ आणि एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली. इकडे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचीही बैठक झाली. यामध्ये सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेते तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली होती. या दोघांना उपमुख्यमंत्रीपद देण्यावर एकमत झाले.

नितीश कुमार म्हणाले, ‘‘लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेससह तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधन युतीमधील परिस्थिती ठीक नव्हती. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. महागठबंधन आघाडीत समन्वय नसल्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मते आणि सूचना मिळत होत्या. मी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि राजीनामा दिला.’’ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी झाला.

आम्हाला याची कल्पना होती

‘आयाराम-गयाराम’सारखे असे अनेक लोक देशात आहेत. पहिले ते आणि आम्ही एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनीही नितीशजी साथ सोडणार असल्याचे सांगितले. आम्हाला हे आधीच माहीत होते; पण इंडिया आघाडी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. पण, लालू प्रसाद आणि तेजस्वी यांची माहिती खरी ठरली.”

एका वर्षात दोनदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी नऊ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. वर्षभरापूर्वीच बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यांच्या पक्षाशी आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. या कार्यकाळांमध्ये यांनी भाजप, राजद अशा वेगवेगळ्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केली. सतत वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी करणे, युती करून सत्तेत बसण्याच्या नितीश कुमार यांच्या या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने ‘पलटू कुमार’, ‘पलटू राम’ अशी खोचक टीकाही केली जाते. २००० साली नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१३ पासून गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रत्येकी दोन वेळा भाजप आणि राष्ट्रीय जनता दलशी फारकती घेऊन नव्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या. नितीश यांनी राज्यपालांना १२८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. नितीश यांना भाजपच्या ७८, संयुक्त जनता दलाच्या ४५, एचएएमच्या ४ आणि एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली. इकडे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचीही बैठक झाली. यामध्ये सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेते तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली होती. या दोघांना उपमुख्यमंत्रीपद देण्यावर एकमत झाले.

नितीश कुमार म्हणाले, ‘‘लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेससह तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधन युतीमधील परिस्थिती ठीक नव्हती. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. महागठबंधन आघाडीत समन्वय नसल्यामुळे मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. मला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मते आणि सूचना मिळत होत्या. मी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि राजीनामा दिला.’’ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी झाला.

राजदसोबत आम्ही खूश नव्हतो

‘‘राज्य कारभार योग्यरीतीने चालत नव्हता. त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे. आम्ही आधी भाजपबरोबर युती केली होती. ती युती तोडून राजदबरोबर आघाडी केली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.’’- नितीश कुमार

नऊ जणांनी घेतली शपथ

रविवारी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या बिहार सरकारमध्ये सम्राट चौधरी (भाजप) उपमुख्यमंत्री, विजय सिन्हा (भाजप) उपमुख्यमंत्री, डॉ. प्रेम कुमार (भाजप) मंत्री, विजय कुमार चौधरी (जेडीयू) मंत्री, विजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू) मंत्री, श्रवण कुमार (जेडीयू) मंत्री, संतोष कुमार सुमन (हम) मंत्री, सुमित कुमार सिंह (अपक्ष) मंत्री यांनी पदाची शपथ घेतली.

logo
marathi.freepressjournal.in