Jammu-Kashmir : परस्परांवर गोळीबार; ४ जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील काठुआ जिल्ह्यात मंगळवारी एका दुर्दैवी आणि खळबळजनक घटनेत सहाय्यक कमांडंटसह चार सीआयएसएफ जवान मृत्युमुखी पडले आहेत.
Jammu-Kashmir : परस्परांवर गोळीबार; ४ जवानांचा मृत्यू
Jammu-Kashmir : परस्परांवर गोळीबार; ४ जवानांचा मृत्यू(Photo-X)
Published on: 

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील काठुआ जिल्ह्यात मंगळवारी एका दुर्दैवी आणि खळबळजनक घटनेत सहाय्यक कमांडंटसह चार सीआयएसएफ जवान मृत्युमुखी पडले आहेत. हा परस्परांवर गोळीबाराचा प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोली भागातील मशका गावातील सेवा-३ पॉवर प्रोजेक्ट येथे ही घटना घडली.

या गोळीबारात सहाय्यक कमांडंटसह ‘सीआयएसएफ’चचचचचे एकूण चार जवान ठार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोन जवानांमध्ये एका मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यातील एकाने अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in