समृद्धी महामार्गावर चार हेलिपॅड बनणार ; अपघातप्रसंगी तातडीच्या मदतीसाठी उपाययोजना

शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर दरम्यान असेल
समृद्धी महामार्गावर चार हेलिपॅड बनणार ; अपघातप्रसंगी तातडीच्या मदतीसाठी उपाययोजना
Published on

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गंभीर अपघात झाल्यास आणीबाणीच्या काळात मदत मिळण्यासाठी चार हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान उभारण्यात येणार आहे. शिर्डी व औरंगाबादलाही हेलिपॅड उभारले जाणार आहे. तर चौथे हेलिपॅड हे औरंगाबाद ते नागपूर दरम्यान असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हेलिपॅडवर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उभारली जाईल. अपघातग्रस्त प्रवाशांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळू शकतील.

गेल्या दशकात एमएसआरडीसीने मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर हवाई रुग्णवाहिकेची सुविधा सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली-मुंबई द्रूतगती महामार्गावरही हेलिपॅडची सुविधा उभारण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद‌्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिर्डी ते भारवीर हा ८० किमीचा हा टप्पा आहे. हा भाग इगतपुरी ते नाशिक दरम्यान आहे. ७०१ किमी समृद्धी महामार्गापैकी ६०० किमीचा मार्ग आता वाहनांसाठी खुला होईल. समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गाचे उद‌्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले. आता भरवीर ते ठाणे हा १०० किमीचा मार्ग मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in