मलाबार गोल्ड, टायटनसह चार भारतीय ब्रँड चमकले

देशांतर्गत लक्झरी ब्रँडचा उदय लक्झरी वस्तूंच्या बाजारपेठेतील विकसित गतिशीलता अधोरेखित करतो.
मलाबार गोल्ड, टायटनसह चार भारतीय ब्रँड चमकले

मुंबई : मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि फॅशन ॲक्सेसरी निर्माता टायटनसह चार अन्य ज्वेलरी कंपन्यांची टॉप-100 लक्झरी ब्रँडच्या जागतिक क्रमवारीत वर्णी लागली आहे. मलाबार गोल्डने देशांतर्गत ज्वेलरी ब्रँडचे नेतृत्व केले आणि सर्वोच्च भारतीय आंतरराष्ट्रीय ज्वेलरी ब्रँड म्हणून १९ वा रँक मिळवला. त्यानंतर टाटा समूहाची कंपनी टायटन कंपनीने २४ वे स्थान मिळवले.

ज्वेलरी कंपनी कल्याण ज्वेलर्स आणि जॉय अलुक्कास डेलॉइट जागतिक लक्झरी वस्तूंच्या २०२३च्या यादीत अनुक्रमे ४६ व्या आणि ४७ व्या स्थानावर आहेत. इतर दोन दागिने निर्माते, सेन्को गोल्ड अँड डायमंड्स आणि थंगामाईल ज्वेलरी अनुक्रमे ७८ व्या आणि ९८ व्या स्थानावर आहेत. वैविध्यपूर्ण फ्रेंच लक्झरी कंपनी LVMH या यादीत अव्वल ठरली आहे. रिचेमॉन्टने तिसरे स्थान मिळवले तर पीव्हीएच कॉर्पने यादीत दुसरे स्थान पटकावले. कोझिकोड-आधारित मलाबार २०२३ मध्ये उत्पन्नाच्या बाबतीत ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यासह यादीत प्रवेश केला आहे, तर टायटनची उलाढाल ३.६७ अब्ज डॉलर्स झाली होती.

देशांतर्गत लक्झरी ब्रँडचा उदय लक्झरी वस्तूंच्या बाजारपेठेतील विकसित गतिशीलता अधोरेखित करतो. देशांतर्गत अर्थव्यवस्था वाढत असताना आणि ग्राहकांच्या पसंती विकसित होत असताना, देशाच्या लक्झरी मार्केटमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे या ब्रँड्सची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. लक्झरी वस्तूंच्या मागणीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशांतर्गत ब्रँड्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी भरपूर संधी मिळतील, असे डेलॉइटने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॉप-100 लक्झरी वस्तूंच्या विक्रेत्यांनी २०२३ मध्ये ३४७ अब्ज डॉलर्सची उलाढाल केली होती, जी वार्षिक आधारावर १३.४ टक्क्यांनी वाढली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in