सौम्या विश्वनाथन हत्याप्रकरणी चौघांना जन्मठेप, एकाला तुरुंगवास

रवी कपूरने विश्वनाथनवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या कारचा पाठलाग करून लुटले.
सौम्या विश्वनाथन हत्याप्रकरणी चौघांना जन्मठेप, एकाला तुरुंगवास

नवी दिल्ली : दूरचित्रवाणी वार्ताहर सौम्या विश्वनाथन यांच्या २००८ मध्ये झालेल्या हत्येतील चार आरोपींना दिल्लीतील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, तर याच हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

न्यायालयाने सांगितले की, हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येत नाही. त्यामुळे फाशीची विनंती नाकारण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलीक आणि अजय कुमार यांना जन्मठेप ठोठावली आहे. अजय सेठी या पाचव्या आरोपीला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. सौम्या विश्वनाथन या एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीमध्ये काम करीत होत्या. त्यांना ३० सप्टेंबर २००८ रोजी पहाटे दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर गोळ्या घालून ठार मारले. त्या कार्यालयातून घरी परत येत असताना त्यांची हत्या केली होती. यामागे लुटमार हा आरोपींचा उद्देश होता, असे पोलिसांनी सांगितले.

रवी कपूरने विश्वनाथनवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या कारचा पाठलाग करून लुटले. कपूर याच्यासोबत अमित शुक्ला, अजय कुमार आणि बलजीत मलिकही होते. पाचवा आरोपी अजय सेठी उर्फ चाचा याच्याकडून पोलिसांनी हत्येत वापरलेली कार जप्त केली होती. १८ ऑक्टोबर रोजी, न्यायालयाने रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तरतुदींनुसार संघटित गुन्हेगारी करण्यासाठी दोषी ठरवले. अजय सेठी याच्यावर अजय सेठीला भारतीय दंड संहिता कलम ४११ (अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता मिळवणे) आणि मोक्का तरतुदींनुसार कट रचणे, मदत करणे किंवा जाणूनबुजून संघटित गुन्ह्यासाठी मदत करणे आणि संघटित गुन्हेगारीचे पैसे मिळवणे यासाठी दोषी ठरविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in