बोगस सोने तारण ठेवून १४ लाखांचे लोन घेऊन फसवणूक

बोगस सोने तारण ठेवून सुमारे चौदा लाखांचे लोन घेऊन एका खासगी बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे.
बोगस सोने तारण ठेवून १४ लाखांचे लोन घेऊन फसवणूक

मुंबई : बोगस सोने तारण ठेवून सुमारे चौदा लाखांचे लोन घेऊन एका खासगी बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध माटुंगा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरिफ जाफर चौहाण, उस्मानी उमेर सिराज अहमद, समीना सिराज अहमद उस्मानी, रेश्मा अब्दुल हमीद पटेल, नजमा सिराज उस्मानी आणि मरिमुथू एसाकी आचार्य अशी या सहाजणांची नावे आहेत. मोहीत बरीचतचंद्र बजाज हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या बँकेने त्यांच्या खातेदारासांठी गोल्ड लोन ही योजना सुरू केली होती. गेल्या दहा वर्षांपासून ही योजना सुरू असून, या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराला तीन लाखांपर्यंत लोन दिले जात होते. या योजनेअंतर्गत पाच खातेदारांना सुमारे चौदा लाख रुपयांचे गोल्ड लोन देण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पडताळणीसाठी बँकेच्या वतीने त्यांच्या पॅनेल ज्वेल ऍप्रेजर मरीमुथू आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in