भारत-म्यानमारदरम्यान मुक्त संचार बंद

अमित शहा यांनी आसाममध्ये २० जानेवारीला भारत आणि म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली होती.
भारत-म्यानमारदरम्यान मुक्त संचार बंद

नवी दिल्ली : भारत आणि म्यानमारमधील मुक्त संचार बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिली.

अमित शहा यांनी आसाममध्ये २० जानेवारीला भारत आणि म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली होती. सध्या दोन्ही देशांदरम्यान १६०० किमी लांबीची सीमा आहे.

१९७० मध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त हालचालींबाबत करार झाला होता. त्याचे शेवटचे २०१६ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. यामुळे दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या प्रदेशाला भेट देता येते. म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना शहा यांनी ही घोषणा केली आहे. नोव्हेंबरपासून ६०० सैनिक भारतात दाखल झाले होते. मिझोराम सरकारने या संदर्भात केंद्राकडे मदत मागितली होती. जानेवारीत म्यानमारमधून पळून गेलेल्या सैनिकांनी मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यातील तुइसांतलांगमध्ये आसाम रायफल्समध्ये आश्रय घेतला होता. सैनिकांनी सांगितले होते की, पश्चिम म्यानमारमधील राखीन राज्यातील सशस्त्र बंडखोर गट अरकान आर्मी (एए) च्या अतिरेक्यांनी त्यांच्या तळांवर कब्जा केला. त्यानंतर ते भारतात पळून गेले.

logo
marathi.freepressjournal.in