ॲमेझॉन, स्विगी, बिगबास्केटवर FSSAI ची कारवाई

विविध नियमांचे उल्लंघन आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) पाच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
ॲमेझॉन, स्विगी, बिगबास्केटवर FSSAI ची कारवाई
ॲमेझॉन, स्विगी, बिगबास्केटवर FSSAI ची कारवाई'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : विविध नियमांचे उल्लंघन आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) पाच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ‘एफएसएसएआय’ने केलेल्या या कारवाईचा फटका ॲमेझॉन, स्विगी इन्स्टामार्ट, बिगबास्केट, फ्लिपकार्ट इंडिया आणि झेप्टो या ई-कॉमर्स कंपन्यांना बसला आहे.

अन्न उत्पादनांबाबत दिशाभूल करणारे दावे करणे आणि बंदी घातलेल्या उत्पादनांची विक्री करणे यांसारख्या नियमभंगांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ‘हॅप्पिलो प्रीमियम डेट बॉईट्स - जेस्टी ऑरेंज’ या अन्न उत्पादनाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

स्विगी इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटच्या प्रकरणात ‘मिलकी मिस्ट’च्या काही दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित दिशाभूल करणारे दावे आणि नियमांचे उल्लंघन करणारी उत्पादन माहिती दिल्याबद्दल कारवाई सुरू करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in