FTA मुळे स्पर्धा वाढेल; MSME ची निर्यातही वाढणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे निर्यातदारांकडून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रास भारताच्या मुक्त व्यापार करारांच्या वाढत्या जाळ्याचा पूर्ण फायदा घेण्याचे केलेले आवाहन उचित आहे.
FTA मुळे स्पर्धा वाढेल; MSME ची निर्यातही वाढणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे निर्यातदारांकडून स्वागत
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रास भारताच्या मुक्त व्यापार करारांच्या वाढत्या जाळ्याचा पूर्ण फायदा घेण्याचे केलेले आवाहन उचित आहे. यामुळे लहान उद्योगांना मोठ्या जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची, जागतिक पुरवठा साखळीशी जोडले जाण्याची आणि स्पर्धात्मकता सुधारण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे, असे निर्यातदारांनी म्हटले आहे.

अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आता सवलतीचा बाजार प्रवेश उपलब्ध असल्यामुळे, या करारांचे रूपांतर प्रत्यक्ष निर्यात ऑर्डर्समध्ये करणे हीच खरी संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सांगितले की, २०१४ पासून भारताने ४० देशांसोबत मुक्त व्यापार करार अंतिम केले आहेत. यामुळे क्षेत्रासाठी संधी निर्माण झाली आहे.

फिओ ही संघटना लहान उद्योगांना नियमावली, मानके आणि बाजारपेठेतील संधींबाबत जागरूक करण्यासाठी या उद्योगासह सातत्याने काम करत राहील. जेणेकरून लहान उद्योगही आत्मविश्वासाने भारतीय उत्पादने आणि ब्रँड्स जागतिक स्तरावर नेऊ शकतील, असे स्पष्ट करण्यात आले.

  • सरकारच्या उपक्रमाचे स्वागत करताना लेदर एक्स्पोर्ट्स कौन्सिलचेचे माजी अध्यक्ष अकील पनारुना म्हणाले की, प्रगतीशील व्यापार करार, परकीय व्यापार धोरणांमुळे नव्या संधी निर्माण होत असून भारत शाश्वत विकास आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • आम्ही भारतीय उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यास वचनबद्ध आहोत, असे पनारुना म्हणाले.

  • पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता, नवोपक्रम, तरुण सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि जागतिक स्पर्धात्मकतेवर दिलेल्या भरामुळे उद्योगांचा सामूहिक संकल्प आणखी मजबूत झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

  • इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गेनाझेशन्स फेडरेशन (फिओ) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, पंतप्रधानांनी या क्षेत्राला मुक्त व्यापार करारांच्या जाळ्याचा पूर्ण वापर करण्याचे दिलेले आवाहन अत्यंत वेळेोचित आणि महत्त्वाचे आहे.

  • मुक्त व्यापार करार हे शुल्कात सवलती मिळवण्यापुरते मर्यादित नाहीत तर ते उद्योगाला जागतिक पुरवठा साखळीशी जोडले जाण्यासाठी, मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरतात.

  • अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सवलतीचा बाजार प्रवेश मिळत असल्याने या करारांचा वापर प्रत्यक्ष निर्यात ऑर्डर्स मिळवण्यासाठी करणे हीच खरी संधी आहे, असे सहाय म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in