इंधनाचे दर अस्थिर, खासगी कंपन्यांचे तेल मंत्रालयाला साकडे

१० जून रोजी पेट्रोल आणि डिझेलची विक्री करताना मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे.
इंधनाचे दर अस्थिर, खासगी कंपन्यांचे तेल मंत्रालयाला साकडे

पेट्रोल आणि डिझेलची विक्री करताना लिटरमागे अनुक्रमे १४ ते १८ रुपये आणि २० ते २५ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून दिवसेंदिवस तोटा वाढत आहे. त्यामुळे तेल मंत्रालयाने हस्तक्षेप करावा. तसे केल्यास गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण राहील, असे साकडे खासगी इंधन रिटेलर्स जिओ-बीपी आणि नयारा एनर्जी यांनी तेल मंत्रालयाला घातले आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (एफआयपीआय)ने १० जून रोजी पेट्रोल आणि डिझेलची विक्री करताना मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे. गेले कित्येक दिवस दर स्थिर ठेवल्याने तोटा वाढत जात आहे. त्यामुळे किरकोळ व्यवसायात आणखी गुंतवणूक येण्यावर मर्यादा येतील, असेही फेडरेशनने पेट्रोलियम मंत्रालयाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. या फेडरेशनमध्ये खासगी इंधन विक्रेत्यांशिवाय इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि एचपीसीएल या कंपन्याही सदस्य आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि उत्पादनांच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून त्या दशकभराच्या उच्चांकावर आहेत. सरकारी इंधन विक्रेत्यांचा किरकोळ इंधन विक्रीतील ९० टक्के हिस्सा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले असून ते आता किंमतीच्या दोनतृतीयांश इतके बरोबर झाले आहेत. या स्थितीमुळे खासगी इंधन विक्रेते - जिओ-बीपी, रॉसनेफ्टच्या नयारा एनर्जी आणि शेल यांना दर वाढवून आपले ग्राहक गमवावे लागतील किंवा तोटा सहन करत विक्री कमी करावी लागेल, असेही फेडरेशनने निवदेनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊन पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्रीचे दर विक्रमी १३७ दिवस - २०२१ मधील नोव्हेंबरच्या प्रारंभापासून ते २१ मार्च २०२२ पर्यंत स्थिर ठेवण्यात ठेवण्यात आले होते.

मात्र, २२ मार्च २०२२ पासून इंधनाच्या किरकोळ विक्री दरात १४ वेळा प्रति लिटरमागे ८० पैशांनी वशढ करत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १० रुपये वाढ झाली. तथापि, त्यानंतर पुन्हा दर स्थिर ठेवण्यात आल्याने डिझेलच्या प्रति लिटरमागे सध्या २० ते २५ रुपये आणि पेट्रोलमागे १४ ते १८ रुपये तोटा होत आहे,असे एफआयपीआयचे महासंचालक गुरमीत सिंग यांनी निवेदनात म्हटले आहे. किरकोळ दरात वाढ करणे थांबवल्यानंतर तेल कंपन्यांनी ६ एप्रिल रोजी इंधनाच्या घाऊक विक्रीत वाढ केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in